सोयाबीन आणि कापूस बाजार भाव वाढणार ( Soybean bhav today )

Soybean bhav today : सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री ना.पियूषजी गोयल व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत मुंबईत झाली बैठक..

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी दीडतासाच्या या बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली…

20231210 112802
Soybean bhav today

बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्न केंद्राकडे मांडतांना उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचीही खंबीर साथ मिळाली, त्यांनीही सोयाबीन-कापूस उत्पादकांची बाजू ताकदीने लावून धरली…

👉सोयाबीन दरवाढीसाठी पामतेलावर आयात शुल्क लावणार, यावर्षी सोयापेंड आयात करणार नाही व सोयापेंड निर्यातीला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे वाणिज्य मंत्री ना.पियूषजी गोयल यांनी ठोस आश्वासन दिले.

👉कापूस दरवाढीसाठी केंद्रीय कृषीमंत्री व संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करून काय सकारात्मक करता येईल तो आमचा प्रयत्न राहील, असा शब्दही ना.पियूषजी गोयल यांनी दिला.

मोफत गॅस मिळणार

👉खाद्यतेलामध्ये पामतेल मिक्स करण्यावर बंदी घालण्याची आग्रही मागणी या बैठकीत केली…

👉सोयाबीन-कापसाचे धोरण ठरविण्यासाठी कायमस्वरूपी अभ्यासगट स्थापन करून वर्षातून दोन बैठका घेण्याची मागणी देखील केली.

👉वस्त्रोद्योगाला सॉफ्टलोन देण्याची मागणीही लावून धरली…

https://aamhishetkaree.com/namo-shetkari-yojana-2st-installment/

👉या बैठकीत कांदा निर्यातबंदीला तीव्र विरोध करत, निर्यातबंदी मागे घेण्याची आग्रही मागणी केली, सोबतच कांदा उत्पादकांच्या तीव्र भावना देखील मांडल्या, निर्णय न घेतल्यास हजारो कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील हे देखील सरकारच्या लक्षात आणून दिले…

👉ऊस उत्पादकांना वाचविण्यासाठी इथेनॉलबंदी उठविण्याची मागणीही लावून धरली…

👉ज्याप्रमाणे गारपीट व अतिवृष्टी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करतात, त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण व हवामानातील बदलामुळे तूर,हरभरा व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून १००% नुकसान भरपाई देण्याची मागणी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली.

👉दूध उत्पादकांना स्पेशल पॅकेज व दुध भूकटीला निर्यात अनुदान देण्याची मागणी देखील केली, यावर अधिवेशनात निर्णय घेण्याचा शब्द ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला.

Soybean bhav today : या सर्व निर्णयांसाठी सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, सरकारने निर्णय घेतल्यास १५ डिसेंबरनंतर सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या आंदोलनाचा राज्यात स्फोट होणार असल्याचा निर्वाणीचा इशारा, सरकारला दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत