प्रधानमंत्री रब्बी पीक विमा योजना हंगाम 2023 ऑनलाईन अर्ज सुरू, ही आहे शेवटची तारीख ? Rabbi Pik Vima 2023

Rabbi Pik Vima 2023: रब्बी हंगामातील पिकांच्या संरक्षणासाठी सरकार दरवर्षी प्रधानमंत्री रब्बी पिक विमा योजना राबवते. यावर्षीही ही योजना लागू करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषिमंत्रालयाकडून रब्बी पिक विमा भरण्यासाठी आवश्यक असलेला PMFBY पोर्टल 3 नोव्हेंबर 2023 रोजी शुक्रवारपासून सुरू करण्यात आला आहे. (Rabbi Pik Vima 2023)

Rabbi Pik Vima 2023
Rabbi Pik Vima 2023

(Rabbi Pik Vima 2023) या योजनेअंतर्गत, गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, रब्बी कांदा, उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांसाठी शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया प्रीमियम भरावा लागेल. उर्वरित रक्कम सरकार आणि विमा कंपन्या मिळून भरतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज भरावा लागेल. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना PMFBY पोर्टलवर जावे लागेल किंवा बँक, विमा कंपनी किंवा CSC केंद्राशी संपर्क साधावा लागेल.

योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळेल. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

रब्बी पीक विमा योजना 2023

(Rabbi Pik Vima 2023) रब्बी पिक विमा योजनेसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांना सहभागी होण्याची संधी आहे. पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर, बागायती गव्हासाठी, मूग आणि रब्बी कांद्यासाठी 15 डिसेंबर आणि उन्हाळी धानासाठी आणि उन्हाळी शेंगदाणासाठी 31 मार्च 2024 पर्यंत विमा भरता येईल.

राज्य सरकारने यंदाच्या खरीप हंगामापासून सर्व समावेशक पिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेनुसार, शेतकऱ्यांना पिक विमा भरताना फक्त एक रुपयाचा विमा भरावा लागेल. उर्वरित विमा रक्कम राज्य सरकार विमा कंपनीला अदा करेल.

खरीप पिक विम्याचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे, कृषी विभागाकडून रब्बी पिक विम्यासाठीही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

सोन्याचे भाव पुन्हा घसरले, खरेदीची अति उत्तम संधी

इन्शुरन्स कंपनी व जिल्ह्यांचा समावेश

विमा कंपनीसमाविष्ट जिल्हा
आयसीआयसीआय (ICICI) लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.परभणी,वर्धा,नागपूर
ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि.अहमदनगर,सोलापूर,सातारा,जळगाव,नाशिक
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.रत्नागिरी,सिंधुदुर्ग,ठाणे
एचडीएफसी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि.पुणे,धाराशिव,धुळे,हिंगोली,अकोला
युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि.कोल्हापूर,गोंदिया,जालना
भारतीय कृषी वीमा कंपनीसांगली,वाशीम,बीड,बुलढाणा,नंदुरबार,वाशीम
चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनी लि.रायगड,औरंगाबाद,पालघर,भंडारा
रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि.अमरावती,यवतमाळ,गडचिरोली
एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.लातूर जिल्हा

जास्त शुल्क आकारणी झाल्यास खालील ठिकाणी तक्रार करा

2023-24 रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागेल. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत सेतू केंद्राकडे किंवा सीएससी केंद्रावर अर्ज करावा लागेल. सेतू केंद्र चालकाला प्रति अर्ज 40 रुपये मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून या योजनेसाठी नोंदणी करता येईल.

जर सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून एक रुपयापेक्षा जास्त पैसे मागितला तर शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.

 1 रुपयात सर्व समावेशक पिक विमा योजना शासन निर्णय (GR)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत