2216 कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार ( Pik Vima News )

Pik Vima News : महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांचे l अतोनात  नुकसान झाले, त्याबाबत  पीकविमा योजना अंतर्गत

पिक विमा यादी इथे क्लीक करून पहा

पीक विम्यासाठी एवढा निधी मंजूर

24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2216 कोटी रुपये इतका  पीकविमा 25% प्रमाणे मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी आज सकाळ पर्यंत 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून सुमारे 634 कोटी रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे,

20231214 180132
Pik Vima News

24 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा लेवल प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना 25% अग्रीम पिक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून सूचना काढण्यात आल्या होत्या. यादरम्यान   महाराष्ट्र सरकार वतीने हवामान तज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या पुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले.

पिक विमा यादी पहा

काही विमा कंपन्यांचे अपील अद्याप तांत्रिक सल्लागार समितीकडे सुनावणी स्तरावर आहेत, ते अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पिकविम्याच्या रक्कमेत पुन्हा  मोठी वाढ होणार आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 1 हजार रुपये पेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केल्या.

पीकविमा यादी इथे क्लीक करून पहा

Pik Vima News : त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम एक हजार पेक्षा कमी असेल, त्या शेतकऱ्यांना किमान  1000 हजार रुपये पीकविमा दिला जाईल, याबाबत कार्यवाही सुरू आहे, असेही स्पष्ट केले.#WinterSession #CropInsurance

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत